Tribal Developement Department

आदिवासी विकास विभाग

थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) अनुषंगाने शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या/घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी.
 1. प्रकल्प कार्यालय वर्धा, वसतिगृह योजना नुतनीकरण अर्ज करताना, वसतिगृह नाव दिसत नसल्याने वसतिगृह अर्ज नुतनीकरण करण्यात अडचणी येत होत्या. सदर त्रुटी दुर करण्यात आलेली आहे. वर्धा प्रकल्प अंतर्गत विध्यार्थी वसतिगृह नुतनीकरण अर्ज दिनांक २९ मे २०२१ करु शकतात. ---------वसतिगृह वॉर्डन यांनी करावयाची कार्यवाही १) प्रोफाइल मध्ये आपल्या वसतिगृहाचे प्रकल्प कार्यालय "वर्धा" असल्याची खात्री करावी. २) नुतनीकरण साठी पात्र विध्यार्थी माहिती "Continue Students/Special Case Students" यात Renew मध्ये भरावी, या पुर्वी सदर कार्यवाही केली असेल तरीही पुन्हा करावी. ३) प्राप्त अर्ज त्वरीत तपासणी करून पुढील कार्यवाही करावी.
 2. वसतिगृह, पंडित दीनदयाल स्वयंम योजना संबंधित चौकशी साठी खालील नंबर वर संपर्क करता येईल. ०२५३-२३१७८०४
 3. शैक्षणिक वर्ष सण २०२०-२१ साठी पंडित दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना ऑनलाईन अर्ज मुदत दिनांक ३0 एप्रिल, २०२१ पर्यंत आहे.
 4. पंडित दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना ऑनलाईन सण २०२०-२१ साठी अर्ज करताना पुढील प्रमाणे अडचण येऊन अर्ज करता येत नाही. "You are not qualified for Swayam because the chosen college is located in the same village as that of your correspondence address." महाविद्यालय मार्फत महाविद्यालयाची प्रोफाइल अद्यावत केल्यास सदर अडचण अर्ज करताना येणार नाही. सर्व महाविद्यालयांना सुचित करण्यात येत आहे त्यांनी आपली प्रोफाइल पुर्ण भरावी(गाव देखील उल्लेख करावा).
 5. सर्वांना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष सण २०२०-२१ मधील प्रवेशा करीता वसतिगृह ऑनलाईन अर्ज प्रक्रिया विद्यार्थां करिता सर्व अभ्यासक्रमासाठी संकेत स्थळ दिनांक ०१ व ०२ एप्रिल , 2021 रोजी बंद असेल. सदर कालावधीत प्रकल्प कार्यालय मार्फत वसतिगृहात नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट बनवण्यात यावी. व तात्काळ वसतिगृह प्रवेश निश्चित करावा.
 6. Pandit Dindayal Upadyay Swayam Application process for the academic year 2020- 21 has been started, and now student can apply(New and Renew) for the scheme for the year. पंडित दीनदयाळ उपाध्यय स्वयंम योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सन 2020-21 साठी सुरू करण्यात आली आहे, विद्यार्थी आता या वर्षा करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करु शकतात.
 7. Online Hostel Application process for the academic year 2020- 21 has been started, and now student can apply(New and Renew) for the scheme for the year. ऑनलाईन वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सन 2020-21 साठी सुरू करण्यात आली आहे, विद्यार्थी आता या वर्षा करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करु शकतात.
 8. Upload clear scan copy of original documents. विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर(Upload ) करावी.
 9. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.
 10. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल.
 11. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चे नाव नोंदणी करताना सदर नाव हे आधार कार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत असावे.
 12. वसतीगृह प्रवेशासाठी/स्वयम् योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद (entry) करताना त्यांचा आधार क्रमांक suspend झाला नसल्याची खात्री करून घेणे तसेच आधार क्रमांक suspend झाला असल्यास तो कार्यरत करून मगच त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.
 13. विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे.
 14. ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही.
 15. Students will responsible for any mistakes done by them while filling application form, the information should be filled responsibly by the student.