Tribal Developement Department

आदिवासी विकास विभाग

VoterID
थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) अनुषंगाने शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या/घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी.
  1. पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना करिता 2025-26, ज्या विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज प्रलंबित आहेत अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज नूतनीकरण करावे वेळेत अर्ज प्राप्त न झाल्यास त्यांच्या जागी नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल याची नोंद विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालय यांनी घ्यावी.
  2. वसतिगृह योजना अभ्यासक्रमस्तर नुसार अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बाबत वेळापत्रक बघण्यासाठी लिंक https://surl.li/dhacca
  3. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नवीन अर्ज सुरु करण्यात आले आहेत त्यांची यादी. ज्या ठिकाणी अर्ज स्वीकारले जात आहे,तिथे YES नमुद आहे. https://surl.li/aegiag
  4. विद्यार्थासाठी महत्वाची सूचना आणि घोषणा पत्र शैक्षणिक वर्ष २०२५-२६, https://drive.google.com/file/d/1UAm_gZUSDBw3ew26iOfRWto-1nnkQisE/view?usp=sharing
  5. वसतिगृह, पंडित दीनदयाल स्वयंम आणि ईतर योजना संबंधित चौकशी/तक्रार साठी टोल फ्री क्रमांक नंबर 1800 267 0007.
  6. वसतिगृह प्रवेश सद्यस्थिती पाहण्यासाठी लिंक https://docs.google.com/spreadsheets/d/1wz7dC-HMl0pai9ksA61Vd4quzPURM7gF6nuYxcjpJCo/edit?usp=sharing
  7. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वसतीगृह नूतनीकरण अर्ज त्वरित भरून आपला प्रवेश निश्चित करावा. वेळेत नूतनीकरण प्रवेश निश्चित न केल्यास आपला वसतीगृह प्रवेश रद्द करून नवीन विध्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल याची नोंद घ्यावी.
  8. अपर आयुक्त व प्रकल्प निहाय वसतीगृह माहिती पाहण्यासाठी लिंक https://listwr.com/bausAZ
  9. आधार प्रमाणीकरण (ऑथेंटिकेशन) करण्यासाठी येणारी तांत्रिक अडचण सोडविण्यात आली आहे.
  10. पासवर्ड विसरलात (Forgot Password) करीता SMS सुविधा मधील तांत्रिक अडचण सोडविण्यात आली आहे.
  11. शैक्षणिक वर्ष २०२५-२६, वसतिगृह रिक्तजागा https://docs.google.com/spreadsheets/d/1khEHtos_5mg4ppdmRXBH9Dk9K8wMyn2c5_62kODgc-Q/edit?usp=sharing
  12. शैक्षणिक वर्ष २०२५-२६, सर्व अभ्यासक्रमासाठी वसतिगृह आणि पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेकरिता नुतनीकरण अर्ज स्वीकारले जात आहे.
  13. शैक्षणिक वर्ष २०२५-२६, कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनिअर कॉलेज) वर्गासाठी नुतनीकरण अर्ज दिनांक ३०/०७/२०२५ पर्यंत स्वीकारले जात आहे.
  14. शैक्षणिक वर्ष २०२५-२६, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुर्व माध्यमिक वर्गासाठी नवीन आणि नुतनीकरण अर्ज स्वीकारले जात आहे. प्रथम गुणवत्ता यादी साठी नवीन अर्ज दिनांक १०-०६-२०२५ पर्यंत स्वीकारले जातील.
  15. लोकसेवा हक्क अधिनियम-2015 जाणून घेण्यासाठी लिंक https://drive.google.com/drive/folders/14N34aO8xbYKEOK6cMiIHx6eiHTA0mfRR?usp=sharing
  16. अत्यंत महत्वाचे: वस्तीगृह योजनेचा विध्यार्थ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल. विध्यार्थ्यानी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे .
  17. परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती साठी संकेतस्थळ लिंक https://fs.maharashtra.gov.in शासन निंर्णय https://drive.google.com/file/d/1XWu7yZs6OHBQ6bFkNFvv9nRAmvubo3Il/view?usp=sharing
  18. विद्यार्थ्यांसाठी तक्रारी प्रकल्प कार्यालय येथे नोंदविण्यासाठी ई-मेल आणि संपर्क नंबर , मार्गदर्शक सुचना तसेच अधिक माहितीसाठी लिंक वापरा. (Gmail Login अनिवार्य आहे.) https://drive.google.com/drive/folders/1XP3C0hm_JIE69IHTy6NEnbzE7SQVahbh?usp=sharing
  19. मागील वर्षाची गुणांकन CGPA मध्ये असेल तर संबंधित विज्ञापीठच्या सूत्रानुसार टक्केवारी अर्जात नमुद करावी.
  20. योजनेसाठी अर्ज दुरुस्तीसाठी विध्यार्थी लॉगिन वर पाठवल्यास अर्जात योग्य तो बदल करून वेळेत पुन्हा ऑनलाईन जमा करावा. अर्ज सद्यस्तिथी वेळोवेळी विध्यार्थ्यानी तपासावी .
  21. वसतिगृह योजना शैक्षणिक वर्ष २०२४-२५, अभ्यासक्रमस्तर नुसार अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बाबत वेळापत्रक. https://drive.google.com/file/d/1S-_Ljk0Pveslc7Knt9iTpfR2Ft3G0dBM/view?usp=sharing
  22. शैक्षणिक वर्ष २०२४-२५, वस्तीगृह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सर्व अभ्यासक्रम स्तरासाठी स्वीकारले जात आहेत. वस्तीगृह योजनेसाठी निवड झाली नाही तर पात्र विद्यार्थी अर्ज अर्जातील दिलेल्या मंजुरी प्रमाणे स्वयंम योजनेसाठी वर्ग केले जातील. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नुतनीकरण ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.
  23. Upload clear scan copy of original documents. विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर(Upload ) करावी.
  24. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.
  25. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल.
  26. सायकल ४ आणि ५ साठी शिफारस करण्यासाठी शैक्षणिक वर्षाचे परीक्षा वेळापत्रक महाविद्यालय मार्फत वेळेत प्रकल्प कार्यालयात सादर करावेत.
  27. वसतीगृह प्रवेशासाठी/स्वयम् योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद (entry) करताना त्यांचा आधार क्रमांक suspend झाला नसल्याची खात्री करून घेणे तसेच आधार क्रमांक suspend झाला असल्यास तो कार्यरत करून मगच त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.
  28. विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे.
  29. ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही.
  30. अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील.

नागरिकांच्या / विध्यार्थ्यांच्या माहितीसाठी स्वयंचलित चॅटबॉट करिता स्कॅन करा  

qrcode

आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सशी जोडलेले रहा -