Tribal Developement Department

आदिवासी विकास विभाग

VoterID
थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) अनुषंगाने शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या/घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी.
 1. शैक्षणिक वर्ष २०२४-२५, वस्तीगृह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रिमॅट्रिक स्तरासाठी व जुनिअर कॉलेज स्तरासाठी नवीन आणि नूतनीकरणसाठी स्वीकारले जात आहेत.
 2. वसतिगृह, पंडित दीनदयाल स्वयंम योजना संबंधित चौकशी साठी टोल फ्री क्रमांक नंबर 1800 267 0007.
 3. विद्यार्थ्यांसाठी तक्रारी प्रकल्प कार्यालय येथे नोंदविण्यासाठी ई-मेल आणि संपर्क नंबर , मार्गदर्शक सुचना तसेच अधिक माहितीसाठी लिंक वापरा. (Gmail Login अनिवार्य आहे.) https://drive.google.com/drive/folders/1XP3C0hm_JIE69IHTy6NEnbzE7SQVahbh?usp=sharing
 4. खासबाब प्रवेशाबाबतच्या लोकप्रतिनिधी शिफारशी दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंतच आयुक्तालयास प्रकल्प कार्यालय मार्फत सादर कराव्यात .
 5. Upload clear scan copy of original documents. विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर(Upload ) करावी.
 6. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.
 7. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल.
 8. सायकल ४ आणि ५ साठी शिफारस करण्यासाठी शैक्षणिक वर्षाचे परीक्षा वेळापत्रक महाविद्यालय मार्फत वेळेत प्रकल्प कार्यालयात सादर करावेत.
 9. वसतीगृह प्रवेशासाठी/स्वयम् योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद (entry) करताना त्यांचा आधार क्रमांक suspend झाला नसल्याची खात्री करून घेणे तसेच आधार क्रमांक suspend झाला असल्यास तो कार्यरत करून मगच त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.
 10. विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे.
 11. ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही.
 12. अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील.